Smrutiayurved's Blog

Soda Bicard - Ayurved Perspective

28 Jan 2022 
Vaidya Harish Patankar    
607   296   0

१. आजकाल अनेक आहारीय पदार्थांत खाण्याचा सोडा घातला जातो, हे आरोग्यासाठी अपायकारक आहे का?

उत्तर- हो, खाण्याचा सोडा हा जमिनीत प्राप्त होणारा एक प्रकारचा क्षार आहे. आजकाल रासायनिक पद्धतीने सुद्धा तो प्राप्त केला जातो. हा साधारण पांढऱ्या रंगाचा असतो. खाण्याच्या सोड्याने आजकाल मसाल्याच्या डब्ब्यात स्थान मिळवले आहे. कडधान्ये शिजवताना, पोळ्या बनविताना , भजी बनविताना वापरला जातो. यामुळे हे जड पदार्थ लवकर शिजायला मदत होते. खाण्याचा सोडा जड, तिखट , स्निग्ध व शीत आहे , वातानुलोमक आहे, मात्र अध......

Read More →

Nagvel Paan - Ayurved Perspective

26 Jan 2022 
Vaidya Harish Patankar    
663   308   0

प्रश्न १ :- खाण्याचे पान याचे आयुर्वेदानुसार गुणधर्म काय आहेत?

उत्तर :- खाण्याचे पान म्हणजे आयुर्वेदामध्ये त्याला नागवेली पत्र होय. हे नागवेली पत्र रसाने तिखट असते. याचे वीर्य उष्ण म्हणजे गरम असते. पान हे मुखशुद्धी करणारे, भूक वाढविणारे व पचन करणारे असे आहे. नागवेलीचे हे पान योग्य दक्षता घेऊन व नियम पाळून खाल्ल्यास अतिशय उत्तम उपक्रम आहे. या पानांचा विडा खाल्ल्याने पोटांच्या अनेक रोगांपासून ते त्वचा रोगपर्यंत अनेक व्याधी बऱ्या होतात. आयुर्वेदामध्ये रोजच्या दिनचार्यमधील एक महत्वाचा घ......

Read More →

Kokam- Ayurved Perspective

26 Jan 2022 
Vaidya Harish Patankar    
655   299   0

कोकम (आमसूल)

१. आमसूल हे भाजीत वापरले जाते, त्याचा काय फायदा होतो?

उत्तर- आमसुलचा उपयोग अत्यंत प्राचीन काळापासून होत आहे. आमसूल चिंचेपेक्षा अधिक आरोग्यदायी आहे. आमसूल आंबट, उष्ण, वायूहारक, कफ वर्धक व पित्त कारक आहे. आमसूल पोषक व स्निग्ध देखील आहे. भाजीत टाकल्याने भाजी थोडी आंबट व चवदार बनते. पचायला हलकी होते. मूळव्याध, पोट दुखणे, पोटात मुरडा येणे यावर आमसुलचे पाणी किंवा कोकम सरबत करून प्यायला दिल्यास तात्काळ आराम मिळतो.

२. आमसुलच्या तुपाचा काय उपयोग होतो?

Read More →

Black Pepper - Ayurved Persepctive

24 Jan 2022 
Vaidya Harish Patankar    
636   306   0

१. काळे व पांढरे मिरे बाजारात मिळते यात काय फरक आहे?

उत्तर- मिरे हा मसाल्याच्या डब्यातील स्त्रियांचा सर्वात आवडता पदार्थ आहे. काळे आणि पांढरे मिरे असे मिऱ्यांचे दोन प्रकार आहेत. अर्धवट पिकलेले मिरे वाळवले की ते काळ्या रंगाचे होते. हे काळेभोर मिरे बाजारात विकले जातात. मिरे पिकल्यानंतर त्याची टरफले आपोआप निघून जातात व पांढरे बनतात त्या मिऱ्यांना सफेद मिरे किंवा पांढरे मिरे असे म्हणतात. मिरे पूर्ण पिकल्यावर त्याचा तिखटपणा कमी होतो व त्यांना एक चांगला स्वाद येतो. पांढरे मिरे जास्त उष्ण ......

Read More →