Smrutiayurved's Blog

White Hair

23 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
292   100   0

1. डोक्यातील पांढरे केस उपटल्यावर पुन्हा पांढरे केस उगवतात असे म्हणतात हे खरं आहे का?

उत्तर- हो, असे म्हटले जाते की डोक्यावरील पांढरे केस उपटले की तिथे पुढील येणारे केस पण पांढरेच येतात व पांढऱ्या केसांची संख्या वाढते पण हे पूर्णतः सत्य नाही. केस उपटून पांढरे केस कमी होत नाहीत हे मात्र सत्य आहे. पांढरे केस बनण्याची प्रक्रिया सुरु झाल्याने पुढील केस अजून पांढरेच येत राहतात, त्यांची संख्या वाढतच जाते म्हणून आपल्याला असे वाटते की ते पांढरे केस उपटल्यामुळे वाढले आहेत. आयुर्वेदात सांगितलेल......

Read More →

Frustration

23 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
209   102   0

1. सतत नैराश्य आल्यासारखे वाटते. काहीही करायची इच्छा होत नाही, काय उपाय करावेत?

उत्तर- सतत नैराश्य आल्यासारखे वाटणे हे लक्षण काही योग्य नव्हे. यामुळे आपली कर्त्या वयातील उमेदीची वेळ निघून जाते. यात एखाद्या गोष्टीचा मेंटल ब्लॉक बसला असेल तर तो लवकरात लवकर विसरून जाऊन त्यातून बाहेर यावे. सकारात्मक विचार करावा. रोज सकाळी लवकर उठून प्रथम व्यायाम व नंतर ध्यान धारणा सुरू करावी, हा अत्यंत प्रभावी उपचार आहे. सकारात्मक मित्रांच्या संगतीत राहावे. घरच्यांना वेळ द्यावा. आयुष्य सुंदर आहे, सुंदर ज......

Read More →

Normal hot water - Ayurved perspective

22 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
198   107   0

1. सकाळी पहाटे उठून कोमट पाणी प्यावे का?

उत्तर- सकाळी आपला जठराग्नी सुर्योदयासोबत जागृत होतो. अग्नी प्रदीप्त होतो. त्यावर थंड किंवा कोमट कोणतेही पाणी टाकलं तरी जशी पाण्यामुळे चूलीतील अग्नी विझतो तसेच या पाण्यामुळे देखील जठराग्नी विझतो. म्हणून सकाळी सकाळी कोमट किंवा थंड कोणतेही पाणी अधिक पिणे योग्य नाही. मात्र साधारण एक कप कोमट पाणी पिल्यास अन्न पाचन प्रक्रिया सुधारते व अग्नी पण प्रज्ज्वलीत होतो. म्हणून प्रमाणात पिण्यास हरकत नाही.

......
Read More →

Water Intake

22 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
257   123   0

1. आहारात पाण्याचे प्रमाण किती असावे?

उत्तर- आहारात ज्याप्रमाणे एखादी सुगरण तांदूळ भिजत घालताना भात उत्तम शिजण्यासाठी जसे तांदळाच्या प्रकारानुसार, चूल, गॅस, भांडी या सर्वांचा विचार करून पाणी किती घालायचं हे ठरविते, त्याचप्रमाणे आपणही आपापल्या पाचन शक्तीचा विचार करून पाण्याचे प्रमाण ठरवावे. पाणी कमी झाल्यास जसा भात करपतो तसेच पाण्याचे प्रमाण कमी झाल्यास अन्न घुसळण्याची प्रक्रिया जठरात उत्तम होत नाही व पचन बिघडते. तसेच भातात पाणी जास्त झाल्यावर जसा भात बिघडतो, गीजगा होतो तसेच आहारात पाण......

Read More →