Smrutiayurved's Blog

Turmeric

02 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
256   111   0

१. लहान मुलांना हळदीचे दूध रोज प्यायला द्यावे का? आणि कधी द्यावे?

उत्तर- हळद ही अत्यंत गुणकारी आहे. भारतीय परंपरेत मसाल्याच्या डब्ब्यात सर्वात महत्वाचे स्थान असलेली, व प्रत्येक आहारात सर्वात पुढे असलेली हळद तेवढीच आरोग्यदायी सुद्धा आहे. हळदीचे गरम दूध रोज सकाळी किंवा रात्री प्यायल्यास आरोग्यासाठी पोषक, रक्तशुद्धीकर, वर्ण उजळवणारे, त्वचेला सुंदर करणारे व आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढविणारे कार्य घडते. बरेच जण रात्री झोपताना हळदीचे दूध मुलांना प्यायला देतात. याने झोप पण उत्तम लागते, घशाती......

Read More →

Banana- Ayurved Perspective

01 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
329   121   0

1. केळी अधिक प्रमाणात खाल्ल्यास कफ वाढतो का?

उत्तर- हो , केळी ही कफवर्धक आहेत, अधिक प्रमाणात सेवन केल्यास कफ वाढतो. विशेषतः कफ प्रकृतीच्या लोकांनी केळी चे रोज सेवन करू नये. तसेच सर्दी किंवा खोकल्याचा त्रास असलेल्या लहान मुलांना देखील रोज रोज केळी खायला देऊ नयेत. केळी कफवर्धक असली तरी आरोग्यास अत्यंत हितकर, शरीराचे बृहण करणारी, बल्य व पोषक आहेत. त्यामुळे वजन वाढविण्यासाठी, व्यायाम करणाऱ्यांसाठी, कष्टाची कामे करणाऱ्यांसाठी केळी सेवन हा उत्तम बालदायी आहार आहे. 


......
Read More →

Udid Daal - Ayurved Perspective

29 Jan 2022 
Vaidya Harish Patankar    
275   118   0

प्रश्न :- १ उडीदाचे गुणधर्म काय आहेत ?

उत्तर :- उडीद हे भारतामध्ये सगळीकडे पिकणारे कडधान्य आहे. उडीद हे पौष्टिक असे कडधान्य आहे. तृप्तीदायक, बल वाढविणारे, वीर्य वाढविणारे हे उडीदाचे गुणधर्म आहेत. प्रसुता स्त्रियांसाठी अंगावरील दूध वाढवण्यासाठी उपयुक्त आहे. उडीद हे जेवणातील रुची सुद्धा वाढवते. शरीरातील फिरता वायूला योग्य दिशा देणारे उडीद विशिष्ट पदार्थासह खाल्ल्यास पचनाला उपयुक्त आहे. पक्षाघातासारख्या आजारामध्ये उडीदाचा उपयोग होतो.


प्रश्न २ :- उडीदाचे पदार्थ पचनास ज......

Read More →

Potato - Ayurved Pespective

28 Jan 2022 
Vaidya Harish Patankar    
334   144   0

१. आजकाल आहारात सगळीकडे बटाट्याची भाजी जास्त असते, किंवा वेगवेगळ्या पद्धतीने त्याचेच पदार्थ खाण्यात येतात. बटाट्याचा आरोग्याच्या दृष्टीने कसा विचार करावा?

उत्तर- बटाटा हा जमिनीखाली येणारा कंद वर्गातला आहे. त्यामुळे बटाटा हा गुरू, पृथ्वी , आप व वायू महाभूताने प्रधान रसाने मधुर, रुक्ष व शीत गुणधर्माचा आहे. बटाट्याच्या सेवनाने आपल्या शरीरातील कफ वाढतो व अपचन झाल्यास वायू सुद्धा वाढून गॅसेस अधिक होतात. बटाटे गुरू व पोषक असल्याने तात्काळ आपल्या शरीराच्या ऊर्जेच्या गरजा भागविते. त्यामुळे ......

Read More →