Smrutiayurved's Blog

Skin diseases

25 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
312   110   0

1. आजकाल त्वचारोग फार वाढले आहेत, आयुर्वेदात काही तात्काळ उपाय आहेत का?

उत्तर- तात्काळ औषध शोधण्याचा व बरे होण्याच्या घाईनेच त्वचारोग वाढलेले आहेत. आपल्याला झालेल्या त्वचारोगाचा प्रकार ही न शोधता लोक वेगवेगळे क्रीम किंवा लोशन लावतात. त्याने थोडा वेळ बरं वाटत पण आजाराचं स्वरूप थोडं बदलत आणि पुन्हा त्वचारोग जास्तच वाढतो. आपली त्वचा ही तेंव्हाच निरोगी असू शकते जेंव्हा आपलं शरीर नोरोगी राहील. लक्षात ठेवा त्वचारोगाचे निदान होणे फार महत्वाचे, डॉक्टरांचे निम्मे आयुष्य त्वचारोग तज्ञ बनण्यात ......

Read More →

Diet After Malaria

25 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
226   131   0

मलेरिया होऊन गेल्यानंतर काळजी कशी घ्यावी? कसे पथ्य पाळावे?

उत्तर- मलेरिया किंवा कोणताही ताप येऊन गेल्यावर आपली पचनशक्ती कमी झालेली असते. शरीरात आम साठलेला असतो. त्यासाठी लंघन करावं, मुगाचे कढणं, भाताची पेज असा हलका आहार करावा. आहारात नियमितता ठेवावी, रात्री लवकर झोपावे, विश्रांती व योगासन प्राणायाम करून अधिकाधिक आनंदी राहण्याचा प्रयत्न करावा.

......
Read More →

Wound In Toungue

24 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
8450   98   0

1. जिभेला जर चिरा पडल्या तर काय करावे?

उत्तर- जीभ हा आपल्या पोटाचा आरसा आहे. जिभेवरून आपली पचनशक्ती ओळखली जाते. जिभेवर चिरा पडणे हे पित्त व वात वृद्धीचे लक्षण आहे. जिभेला चिरा पडल्या असल्यास आहारात तुपाचे प्रमाण वाढवावे, वेळेवर जेवण करावे. फार तिखट व उष्ण पदार्थ खाऊ नयेत. आणि रोज ब्रश केल्यानंतर थोडंस घोटभर तीळ तेल तोंडात धरून सर्व जिभेवर फिरवावे, याला कवल धारण असे म्हणतात. कवल धारण केल्याने जिभेवरील चिरा नाहीश्या होतात. पचनशक्ती सुधारते. दातांना व हिरड्यांनाही बळ मिळते.

......
Read More →

Hair Straightening

24 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
228   102   0

आजकाल केसांचे स्ट्रेटनिंग केले जाते ते योग्य आहे का?

उत्तर- आजकाल अनेक मुली केसांचे स्ट्रेटनिंग करून घेत असतात. खरतर हे आपापली प्रकृती पाहून , केसांची प्रकृती पाहून, अतिस्निग्ध केस असतील तरच केले पाहिजे, अन्यथा यामुळे तात्पुरते केस छान वाटत असले तरी कायमचे दीर्घकालीन खराब होऊ शकतात. केस सरळ छान होतात, मात्र ते करत असतानाच केस जळल्याचा वास येत असतो, त्यातील केराटिन नामक प्रोटीन जळत असत. त्यामुळे केस अत्यंत रुक्ष होतो, त्यास पुन्हा अधिक बाह्य व आभ्यान्तर प्रोटीन व स्निग्ध गुणांची गरज पड......

Read More →