Smrutiayurved's Blog

Jaggery - Ayurved Perspective

08 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
711   299   0

1. आहारात आजकाल साखरेऐवजी गुळ वापरायला सांगतात. नक्की काय फायदे होतात गुळ सेवन केल्यास?

उत्तर- साखरेपेक्षा गुळ कधीही श्रेष्ठच आहे. साखर बनवण्यासाठी अनेक रासायनिक प्रक्रिया असतात मात्र त्यामानाने गुळ नैसर्गिक पद्धतीने बनविता येतो. ऊसाच्या रसातील बरेच पाणी आटवून त्यापासून गुळ बनविला जातो. त्यामुळे यात ऊसातील सर्व क्षार व खनिजद्रव्ये टिकून राहतात. गुळाने थकवा लगेच कमी होतो. लहान मुले व स्त्रियांना थोड्याश्या श्रमानेही थकवा जाणवत असल्यास त्यांनी आहारात गुळाचे सेवन करावे. गुळ जसजसा जुना ......

Read More →

Ulcerative colitis - Ayurved Perspective

08 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
669   288   0

मला अलसरलेटिव कोलायटिस नावाचा आजार आहे दिवसातुन पाच सहा वेळा जुलाब होतात, तर यावर उपचार काय काय पथ्य पाळावी लागतील?

उत्तर- अल्सरेटिव्ह कोलायटिस हा आजार आयुर्वेदानुसार आपल्या शरीरातील पित्त वाढत गेल, त्याची उष्णता वाढत गेली की पोटात आतड्यांना आतून या वाढलेल्या पित्ताच्या उष्णतेमुळे जखमा होऊन होतो. यात पचनशक्ती बिघडल्याने अधिक वेळा मल त्यागासाठी पण जावे लागते, सतत पोट साफ होते, पोट दुखते, काहीही खाल्लं तरी बऱ्याचदा पोट साफ करायला जावे लागते. या आजारावर वैद्याच्या सल्ल्यानेच उपचार सुरू......

Read More →

Fig

07 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
795   305   0

1. अंजीर खाण्याचे काय फायदे होतात? कोणी कोणी ते खावे?

उत्तर- अंजीर हे पित्तशामक व रक्तवृद्धी करणारे आहे. अशक्त लोकांनी रोज सकाळी याचे सेवन केल्यास अंजिराच्या अंगी असणाऱ्या रक्तवृद्धी व रक्तशुद्धी च्या गुणधर्मामुळे त्यांचा अशक्तपणा लवकर दूर होतो. अंजिराच्या कच्च्या फळांची भाजी करतात ती जास्त रुचकर नसली तरी बाधक ही नाहीये. पिकलेल्या फळांचा मुरंबा करतात तोही बल्य व रक्तवर्धक आहे. शिशिर ऋतूमध्ये थंडीच्या योगाने जेंव्हा जीभ व तोंड ही फुटतात तेंव्हा अंजिराच्या पानांची राख ओठांना घासली जात......

Read More →

Tamarind - Ayurved Perspective

07 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
703   306   0

चिंच खावी का? चिंचेचे काय फायदे होतात?

उत्तर- कोवळ्या चिंचा या अति आंबट मात्र रुचिकर असतात. अग्निदीपक व वात नाशक ही आहेत, मात्र पित्त वर्धक व रक्त दुष्टी करणाऱ्या आहेत. पक्व चिंचा मधुर रसात्मक, सारक , आंबट व हृद्य आहेत. चिंचा या आंबट गुणांच्या असल्याने आहारात अनेक भाज्या, पाणीपुरीचे पाणी तसेच आयुर्वेदात अनेक औषधांसाठी वापरल्या जातात. चिंचेचा पाला सुद्धा औषधी आहे. पूर्वी विंचू दंश झाल्यावर चिंचोका काढून त्याचा पंधरा भाग त्यावर चिकटवावा. तो विष शोषून घेऊन आपोआप खाली पडतो व वेदना ही कम......

Read More →