Millets seeds
18 Mar 2022Vaidya Harish Patankar
372 125 0
आहारात बाजरीच्या भाकरीचा समावेश करावा का? बाजरीचे गुणधर्म काय?
उत्तर- बाजरी ही गव्हाईतकीच पौष्टिक आहे. पूर्वी महाराष्ट्राच्या अनेक भागात बाजरी हेच प्रमुख अन्न होत. बाजरी ची भाकरी व म्हशीचे दूध हे फारच पौष्टिक असते, बलवर्धक असते. तूप , लोणी लावलेली बाजरीची भाकरी खूप चविष्ट लागते. बाजरी उष्ण असल्याने ती पावसाळ्यात व हिवाळ्यात सेवन करावी, उन्हाळ्यात खाणे टाळावे. तसेच बाजरीची भाकरी खाल्ल्याने मलावरोध होतो, काहींना लगेच मूळव्याधीचा त्रास होतो, यांनी बाजरीची भाकरी खाणे टाळावे. बाजरीच्या प......
Calabash
17 Mar 2022Vaidya Harish Patankar
391 151 0
1.दुधी भोपळ्याचा रस रोज सकाळी पिणे हृदयासाठी चांगले आहे का?
उत्तर- खरंतर दुधी भोपळाच काय पण कोणत्याच अश्या फळभाजी चा उगीच रस काढून किंवा वेगवेगळ्या फळभाज्या एकत्र करून सकाळी सकाळी उपाशी पोटी रस पिवू नये. असे रस पचायला जड असतात. लक्षात ठेवा फळांचा रस वेगळा आणि फळभाज्यांचा रस वेगळा. एकवेळ फळांचा रस चालेल जसे की मोसंबी, संत्री, अननस, सफरचंद, कलिंगड पण फळभाज्या म्हणजे कारली, दोडका, दुधी भोपळा, भेंडी, पडवळ यांना न शिजवता कच्चा रस काढून पिल्यास तो अल्प प्रमाणात घेतला तरी तो पचायला जडच असत......
Sugar Apple
11 Mar 2022Vaidya Harish Patankar
395 136 0
1. लहान मुलांना सीताफळ दिल्यास सर्दी होते का?
उत्तर- सीताफळ हे खूप थंड गुणधर्माचे आहे. त्याच्या अधिक सेवनाने शैत्य उत्पन्न होते , म्हणूनच त्याचे नाव 'शीत फळ' अर्थात सीताफळ आहे. याच्या अधिक सेवनाने लहान मुलांना चटकन सर्दी होते. लहान मुले असेही कफारचीच असतात. त्यांना कफवर्धक फळे खाऊ घातल्यास त्यांचा कफ पटकन वाढून त्यांना सर्दी होते. मात्र लहान मुलांना सीताफळ खूप आवडते, सर्दी नसताना ते त्यांना जरूर द्यावे. सीताफळ अत्यंत बल्य, पौष्टिक , मांसपेशींना बळ देणारे, लहान मुलांना वाढीला मदत करण......
Gram
11 Mar 2022Vaidya Harish Patankar
416 133 0
1. आयुर्वेदात हरभरा डाळीचे पदार्थ लगेच बंद करायला सांगतात, असे का? हरभरा, चणे खाऊ नयेत का?
उत्तर- असे काही नाही. हरभरा, चणे किंवा त्यापासून बनणारे बेसन पीठ व त्याचे पदार्थ उत्तरोत्तर अजून पौष्टिक आहेत, मात्र पचायला जड असल्याने आदीच पचनशक्ती कमी झालेल्या रुग्णांना बरे होईपर्यंत यांचे पथ्य पालन करण्यास सांगितले जाते. हरभरे थंड, रुक्ष, वायुकारक, व मलावष्टंभ निर्माण करणारे आहेत. कफ व पित्त विकारात यांचा फायदा होतो. सर्दी खोकला झाला तरी चणे भाजून खाल्ले की लगेच कमी होतो. भाजलेले चणे गरम,......
Latest Posts
-
Urine......
( 3 years ago) -
Vaman, Virechan......
( 3 years ago) -
Child Development......
( 3 years ago) -
Asthama......
( 3 years ago) -
Toor Daal......
( 3 years ago)