Smrutiayurved's Blog

Child care

04 Mar 2022 
Vaidya Harish Patankar    
206   97   0

1. लहान मुलांना सतत सर्दी होत आहे, छाती भरली आहे, काय उपाय करावा?

उत्तर- लहान मुलांना सतत होणारी सर्दी व भरलेली छाती हे कफ वाढल्याचे लक्षण आहे. त्यामुळे मुलांचा कफवर्धक आहार कमी करावा. दूध, केळी, पनीर, बेकारी चे पदार्थ कमी करावेत. मूळ अंगावर पीत असल्यास आईने कफवर्धक आहार टाळावा. दिवसा जेवणानंतर झोपणे टाळावे. मुलांचे छाती पाठ, पोट ओव्याच्या पुरचुंडीने शेकावे, वेखंड चूर्ण कपाळ, छाती, पाठीला थोडेसे लावावे, जमल्यास जेष्ठमधाची काडी चघळायला द्यावी. सितोपलादी चूर्ण थोडंस मधासह दोन तीन वेळा......

Read More →

Diabetes - Ayurved Perspective

28 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
288   103   0

1. मधुमेहाच्या रुग्णांनी केळी खायला हवी का?

उत्तर- मधुमेह केळी किंवा तत्सम कफवर्धक फळे अधिक खाल्ली तर रक्तातील साखर वाढून व कफ वाढून अधिकच वाढतो. त्यामुळे शक्यतो केळी कमी प्रमाणात खावीत. मात्र उपचारांमध्ये सुद्धा पिकलेले केळी आवळ्याच्या चूर्णासोबत रात्री खायला दिल्यास मधुमेहात होणाऱ्या सततच्या लघवीचे प्रमाण कमी होते, हा उपचार मात्र वैद्यकीय सल्ल्यानेच करावा. केळी ही उत्तम पोषक आहेत मात्र प्रमाणात खावीत कारण ती कफवर्धक पण आहेत. 


2. आयुर्वेदात मधुमेह सांगितला आहे क......

Read More →

Steamed Dumpling (Modak)

28 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
217   110   0

मोदक बुद्धिवर्धक असतात की कफवर्धक?

उत्तर- मोदक हे गव्हाचे पीठ, किंवा तांदळाचे पीठ, खोबऱ्याचा किस, गुळ, थोडी वेलची पासून उकडीचे मोदक बनवतात. भरपूर तूप टाकून खाल्ले जातात. खरंतर यातील सर्वच घटक कफवर्धक आहेत. पण खोबरे व तूप हे बुद्धिवर्धक पण आहेत. कठीण कवचाची फळे ही शक्यतो बुद्धिवर्धक असतात. गणपती बुद्धीची देवता आहे. मोदकाने पोषण उत्तम होते, मात्र अति प्रमाणात खाल्ल्यास वजन वाढणे, झोप जास्त लागणे, कफ वाढणे इत्यादी त्रास पण होऊ शकतात. लहान मुलांना मोदक आवर्जून खायला द्यावेत. त्यामुळे म......

Read More →

Bermuda Grass (Durva) Juice

28 Feb 2022 
Vaidya Harish Patankar    
219   99   0

दुर्वा चा स्वरस आपण रोज घेऊ शकतो का?

उत्तर- दुर्वा या गणपती पूजेतील पण सर्वात महत्वाच्या पत्री आहेत. दुर्वा या आयुर्वेदानुसार पित्त शामक आहेत, आपण दुर्वा स्वरस रोज घेऊ नये मात्र आपणास पोटात जळजळ होत असेल, पित्त वाढले असेल, पचनशक्ती बिघडली असेल, डोके दुखत असेल, माथा शूल असेल, डोकं गरम लागत असेल तर एक चमचा दुर्वा स्वरस खाडीसाखरेसह घेऊ शकता. आजकाल दुर्वा कल्प सुद्धा मिळतो, तोही उत्तम बल्य, रोगप्रतिकारक शक्ती वर्धक व लहान मुले आणि स्त्रियांसाठी उत्तम आहे. दुर्वा स्वरस वा कल्पाने पाळीच्या......

Read More →